‘टायगर’ची बहिण ‘कृष्णा’नं ‘लॅम्बोर्गिनी’ची घेतली टेस्ट ‘ड्राइव्ह’, ब्रॉयफ्रेंड म्हणाला – ‘I am Scared’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडिल आणि भाऊ अ‍ॅक्टर असूनही कृष्णा सिल्वहर स्क्रिनपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अ‍ॅक्टीव आणि चर्चेत असते. पुन्हा एकदा ती तिच्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे.

कृष्णाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात लॅम्बोर्गिनी चालवताना दिसत आहे. तिचा बॉयफ्रेंड फुटबॉल प्लेअर इबान हॅम्सनं कृष्णाचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. कृष्णानं पिवळ्या रंगाची ही कार अशी काही पळवली की, इबानंही थोडा चिंतेत दिसला. त्यानं तिला गाडी हळू चालवायला सांगितल्याचंही दिसत आहे. कृष्णा तिची राईड पूर्ण करून आल्यानंतर इबान तिला म्हणतो, मी थोडा घाबरलोच होतो.

https://www.instagram.com/p/B9OivGsAIl_/?utm_source=ig_embed

कृष्णानं स्वत: हा व्हिडीओ तिच्या इंस्टावरून शेअर केला आहे. काह फोटोही तिनं शेअर केले आहेत ज्यात कृष्णा लॅम्बोर्गिनीसमोर पोज देत फोटो काढताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये कृष्णा म्हणते, “माझी सवारी किंवा Die.” कृष्णाच्या या पोस्टवर टायगर श्रॉफनंही कमेंट केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, सुंदर दिसत आहे. सध्या कृष्णाचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B8hbMVWF_Up/

https://www.instagram.com/p/B239heLlTv2/

https://www.instagram.com/p/B9GvvyOHAe3/

https://www.instagram.com/p/B6sNxJ-AHwj/

https://www.instagram.com/p/B5CrCS1AFJO/