Photos : अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहांचे ख्रिश्चन पद्धतीने ‘लग्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लाखोंच्या मनावर राज्य करणारी बंगाली अभिनेत्री नुसरत जहांने खासदार झाल्यानंतर लॉंग टाईम रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या बॉयफ्रेंड निखिल जैन सोबत लग्नगाठ बांधली आहे. नुसरतने 19 जून रोजी निखिलसोबत हिंदू पद्धतीने लग्न केलं. यानंतर आता नुसरतने 20 जून रोजी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे. नुकतेच नुसरत आणि निखिल यांचे ख्रिश्चन पद्धतीने केलेल्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. सध्या हे फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत. या फोटोत नुसरत व्हाईट वेडिंग ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. निखिलचा आनंदही त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

नुसरतने तु्र्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये हिंदू पद्धतीने लग्न केले. त्यानंतर तिने इस्तांबुलमधीलच एका बीचवक ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. तिच्या या लग्नाचे फोटोही तितकेच सुंदर आले आहेत. नुसरत-निखिल यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यानंतर पार्टीही ऑर्गनाईज केली होती. या लग्नात त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईकच होते.

image.png

https://www.instagram.com/p/By9yAchHlAE/?utm_source=ig_embed

निखिलने नुसरतला असे केले प्रपोज

समुद्रिकिनारी नुसरतचा पती निखिलिने गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केले आणि रोमँटीक अंदाजात तिला रिंगही घातली. यावेळी नुसरतने व्हाईट कलरचा डिझायनर ड्रेस घातला होता. तर निखिलने ब्लॅक कलरचा कोट पँट असा ड्रेस घातला होता.

https://www.instagram.com/p/By9x4mmn39-/?utm_source=ig_embed

नुसरत-निखिल विषयी थोडक्यात…

नुसरत जहां अ‍ॅक्ट्रेस, मॉडेल आणि पश्चिम बंगालच्या बशीरहाट मधून टीएमसी खासदार आहे. तर निखिल जैन कोलकात्यामधील नामवंत आणि यशस्वी बिजनेसमन आहे. दोघांनी अनेक दिवस एकमेकांना डेट केलं. जशी नुसरत खासदार झाली तिने लगेचच लग्नाची घोषणा केली. दोघांनीही आधी सोशल मीडियावर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आणि एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले.

https://www.instagram.com/p/By9YXHph4Xt/?utm_source=ig_embed

नुसरत-निखिल फिल्मी लवस्टोरी

नुसरत आणि निखिलची लवस्टोरी खूपच फिल्मी आहे. त्यांची पहिली भेट तर अशी होती. जशी काय सिनेमाची स्क्रिप्ट आहे. पहिल्यांदा नुसरत निखिलला 2018 मध्ये दुर्गापुजा दरम्यान भेटली होती. याला पहिल्या नजरेतील प्रेम म्हणा किंवा नशीब दोघांचीही पहिली भेट मैत्रीत बदलली. नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. निखिलसोबत लग्न करायचं तिने आधीच ठरवलं होतं. त्यामुळे खासदार बनताच तिने लग्नाची घोषणा केली.

https://www.instagram.com/p/Byz9x0IBCsy/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/By6JrcDn9v1/

image.png

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’