TMC खासदार ‘नुसरत जहां’नं साइन केला चित्रपट, पोस्टर रिलीज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीएमसीच्या खासदार नुसरत जहां यांनी सक्रिय राजकारणाला नुकतीच सुरुवात केली होती, मात्र त्यांनी चित्रपटांमधून निवृत्त घेतलेली नाही. बऱ्याच काळापासून चित्रपटापासून दूर असलेल्या नुसरतने खासदार झाल्यावर लग्न केले आणि आपला पहिला चित्रपट साइन केला.

नुसरतने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. नुसरतने ‘असुरा’ नावाचा चित्रपट साइन केला आहे. हा एक बंगाली चित्रपट आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध झाले आहे.

asur

पोस्टरमध्ये दुर्गा मातेची प्रतिमा दिसली असून एक व्यक्ती तिची आरती करताना दिसत आहे. पहिले पोस्टर 31 ऑगस्ट रोजी ट्विटरवर शेअर केले गेले होते. नुसरतने शेअर केलेल्या पोस्टरसोबत लूक पोस्टर रिलीज करण्याबद्दलही सांगितले. मात्र हे पोस्टर कोठे दिसून आले नाही.

पहिले पोस्टर पाहिल्यानंतर प्रत्येकजण नुसरत जहांच्या लूकची वाट पाहत आहे. नुसरतच्या पोस्टवर अशा कमेंट आहेत की ‘आम्ही असुरची वाट पाहत आहोत’.

नुसरत वर्ष 2018 मध्ये ‘नकाब’ चित्रपटात दिसली होती आणि तिचा ‘क्रिसक्रॉस’ हा सिनेमा 2018 मध्ये आला होता. त्यानंतर तिने राजकारणाकडे लक्ष देत एकही प्रोजेक्ट स्वीकारला नव्हता. आता मात्र लवकरच असुरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात 2011 मध्ये ‘शत्रु’ पासून केली होती. यानंतर खिलाडी, ऍक्शन, पॉवर, झुल्फिकार, आमि जे के तोमार असे अनेक चित्रपट केले. काही दिवसांपूर्वी ती निखिल जैनसोबत तिच्या लग्नाविषयी चर्चेत होती. लग्नासाठी ब्रेक घेतल्यानंतर आता नुसरत पुन्हा चित्रपट क्षेत्रात उतरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त