Torbaaz Trailer : रेफ्युजी कॅम्पमधील मुलांना क्रिकेट शिकवण्यासाठी पोहोचला संजय दत्त ! तोरबाजचा ट्रेलर Out

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार संजय दत्त (Sanjay Dutt) यानं अलीकडेच कर्करोगावर मात केली आहे. यानंतर तो पुन्हा एकदा कामाला लागला आहे. गेल्या 28 ऑक्टोबर रोजी त्यानं सडक 2 सिनेमातून धमाल केली. यानंतर पुन्हा एकदा तो धमाकेदार वापसीसाठी तयार आहे. संजय दत्तचा आगामी सिनेमा तोरबाज (Torbaaz) चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सध्या चाहत्यांमध्ये या ट्रेलरची खूप चर्चा सुरू आहे.

ट्रेलरमध्ये नेमकं काय ?
संजय दत्त रेफ्युजी कॅम्पमधील मुलांना क्रिकेट शिकवताना दिसत आहे. अफगाणिस्तानमधील रेफ्युजी कॅम्पमधील मुलांचा क्रिकेट कोच म्हणून संजय दत्त भूमिका साकारत आहे. यात दिसत आहे की, ही मुलं आतंकवादाच्या वातावरणात राहात असतात. त्यांना एक उत्तम क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्याची धडपड यात दिसत आहे. नेटफ्लिक्स इंडिया (Netflix India) नं हा ट्रेलर रिलीज केला आहे.

ट्रेलर रिलीज होताच सोशलवर चर्चेत आला आहे. काही तासांतच याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. अनेकांना ट्रेलर पाहून सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकजण संजयला पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

संजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो KGF चॅप्टर 2, सडक 2 आणि मुंबई सागा अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमातही तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.