‘सैफ-अमृता’च्या घटस्फोटानं खुश आहे सारा, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सारा अली खान सध्या आपल्या लव आज कल 2 सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या सारा प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत बोलताना सारानं आपल्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं आहे. आई अमृता सिंह आणि वडिल सैफ अली खान यांच्या वेगळं होण्यानं ती खुश असल्याचं तिनं सांगितलं आहे. सारा सागंते की, तिचं सैफवर प्रेम आहे परंतु आई अमृताच्या ती खूप क्लोज आण याशिवाय सारासाठी अमृता प्रेरणास्थान आहे असंही ती सांगते.

सारा म्हणाली, “मी अनेकदा लोकांना असं म्हणताना ऐकलं आहे की, ते आपल्या मुलांसाठी एकत्र रहात आहेत. परंतु मला असं वाटतं की, जर तुम्ही खुश नसाल तर मुलांना कसं खुश ठेवू शकता. असं घुसमट असणाऱ्या आयुष्यामुळे कोणीच खुश राहू शकत नाही. यानं कोणालाच फायदा होत नाही. मला आनंद आहे की, माझे आई वडिल अशा घुसमट असणाऱ्या आयुष्यापासून स्वतंत्र आहेत. आज माझ्याकडे घुसमट असणाऱ्या एका घरापेक्षा दोन आनंदी घरं आहेत. मी खूप खुश आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तिचा लव आज कल 2 सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात सारा कार्तिक आर्यन सोबत काम करताना दिसणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी सिनेमा सगळीकडे रिलीज होणार आहे. नुकतीच सारानं तिच्या अतरंगी रे या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष सोबत काम करताना दिसणार आहे.