‘हे’ काम फक्त सनी लिओनीच करू शकते ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी काही दिवसांपूर्वीच थायलंडला फिरायला गेली होती. यावेळी सनीनं काही फोटो शेअर केले होते जे सोशलवर व्हायरल झाले होते. यानंतर पुन्हा एकदा तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सनीनं जे काही केलं असं तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. सध्या सनी आपल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की सनी एका झाडाच्या फांदीवर चढत आहे आणि तिथेच जरा रिलॅक्स करत आहे. सनीनं स्वत: हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे ज्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

सनीचे सोशलवरील फॉलोवर्स दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सनी सोशलवर नेहमीच सक्रिय असते आणि आपले एक सें बढकर एक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. सनीचे सोशलवर 30.3 मिलियन फॉलोवर्स झाले आहेत.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.