Tu Ki Jaane Song : नेहा भसीननं दाखवला आतापर्यंतचा सर्वात ‘बोल्ड’ अवतार ! ‘हॉट’ सीन्सनं खचाखच भरलंय गाणं

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडमधील फेमस सिंगर नेहा भसीन (Neha Bhasin) सध्या आपल्या बोल्डनेसमुळं चर्चेत येताना दिसत आहे. अलीकडेच नेहाचं एक नवीन गाणं रिलीज झालं आहे. यात नेहा आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड अवतारात दिसत आहे. न्यूड सीन्समुळं हे गाणं सध्या अटेंशन घेताना दिसत आहे. यात नेहाचा प्रचंड बोल्ड अवतार दिसत आहे. तू की जाने (Neha Bhasin – Tu Ki Jaane) असं या गाण्याचं नाव आहे.

नेहाचं हे गाणं 11 जानेवारी 2020 रोजीच रिलीज झालं आहे. काही तासातच हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. एका दिवसातच या गाण्यानं जवळपास 2 लाख व्ह्युज मिळवले. नेहाचं हे गाणं सध्या युट्युबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर नेहा भसीननंच या गाण्याला आवाज दिला आहे. हे गाणं रोमँटीक आणि सॅड साँग आहे. सोशल मीडियावर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. इतकंच नाही तर नेहा भसीनचा गाण्यातील अंदाजही सर्वांना खूप आवडला आहे.

नेहा भसीन सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टीव्ह असते. बोल्ड लुकसाठी ती सोशल मीडियावर फेमस देखील आहे. बोल्डनेसमुळंही नेहा सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होताना दिसली आहे. तिनं याला वैतागून यावर एक गाणंही बनवलं होतं. कहंदे रहंदे असं या गाण्याचं नाव होतं.