‘भाईजान’ सलमानला सपोर्ट करण्यासाठी सुनील ग्रोवरनं केलं Tweet – ‘I Respect Salman Sir’ ! युजर म्हणाला – ‘रिस्पेक्ट नव्हे चापलूसी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर आता सोशलवर इनसाईडर्स-आउटसईडर्स, नेपोटीजम अशी अनेक मुद्द्यावर चर्चा रंगली आहे आणि वादही होत आहे. इतकंच नाही तर लोकांनी अनेक स्टार्सला नेपोटीजमच्या नावाखाली टारगेट केलंय. सुशांत आऊटसाईडर्स असल्यानं अनेकांनी त्याला नाकारलं असंही बोललं जात आहे.

इंडस्ट्रीतील राजकारणाचा मुद्दा अनेक अॅक्टर्सनही उचलून धरला आहे. इतकंच नाही तर सलमान खानला बॉयकॉट करण्यावरूनही अभियान सुरू झालं आहे. अभिनव कश्यपच्या फेसुबक पोस्टनंतर सध्या सोशलवर सलमान विरोधात तिरस्काराचंही वातावरण दिसत आहे. अशात अभिनेता सलमान खानला सपोर्ट करणाराही ट्रोल होत आहे.

अभिनेता सुनील ग्रोवर देखील नुकताच ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. सलमामसाठी काही शब्ह लिहिल्यामुळं सुनील ग्रोवर जबरदस्त ट्रोल होत आहे. रविवारी(दि 21 जून) सुनीलनं ट्विट केलं होतं की, “माझं सलमान सरांवर प्रेम आहे आणि त्यांनी त्यांचा आदर करतो.”

सुनीलच्या या रिस्पेक्टनंतर तो ट्रोल होताना दिसला. अनेकांनी त्याचा आदर म्हणजे चापलूसी आहे असंही म्हटलं आहे आणि त्याचा बहिष्कार करण्यासाठीही बोललं जात आहे.

काही लोक असेही होते ज्यांनी सुनीलची बाजू घेतली. फिल्ममेकर निखिल द्विवेदीनं ट्रोलर्सला उत्तर दिलं. एकानं सुनीलला ट्रोल करताना लिहलं की, यांच्याकडे आता दुसरा पर्याय तरी कुठे आहे. निखिलनं लिहिलं की, “खूप सारे पर्याय आहेत. सलमान खाननं त्याला नाही बनवलं. टीव्हीवर सर्वाधिक कमाई करणाऱ्यांपैकी एक ते स्वत:च बनले आहेत. सलमानचा मित्र तर तो आता झालाय. मित्र मित्रासाठी तेव्हाच धावून येतो जेव्हा त्याला माहित असतं की, जे बोललं जात आहे त्यात तथ्य नाहीये.

यावर एकानं कमेंट केली की, इंडस्ट्रीत सरवाईव करण्यासाठी सलमानचा मित्र बनून राहणं गरजेचं आहे.