‘सूर्यवंशी’मध्ये कोणत्याही सेफ्टीशिवया केला ‘हेलिकॉप्टर स्टंट’, ‘अशी’ होती ट्विंकल खन्नाची ‘रिअ‍ॅक्शन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायरेक्टर रोहित शेट्टी आणि बॉलिवूड स्टार अक्षय कुमार सध्या आगामी सिनेमा सूर्यवंशीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रोहित शेट्टीच्या कॉप सीरीजमधील हा चौथा सिनेमा आहे. यात अक्षय कुमारचे अनेक अ‍ॅक्शन सीन आणि स्टंट आहेत. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना त्यानं हे स्टंट केले आहेत. पत्नी ट्विंकल खन्नानं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एका कॉमेडी शोमध्ये जेव्हा अक्षयला विचारण्यात आलं की त्याच्या हेलिकॉप्टर स्टंटबद्दल पत्नी ट्विंकल खन्नाची काय रिअॅक्शन होती. यावर अक्षय म्हणाला, त्यांनी आता मला काही बोलणं सोडून दिलं आहे. अक्षयच्या या स्टंटमुळं त्याला खिलाडी कुमार म्हणूनही ओळखलं जातं.

रोहितनं सांगितलं की, बाईकनं हेलिकॉप्टरवर उडी घेण्याचा स्टंट अक्षयनं कोणत्याही मदतीशिवाय केला आहे. अक्षयचे स्टंट पाहून क्रू आणि रोहित सारेच हैराण झाले होते. अक्षय आणि रोहित शेट्टीनं एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ लिड रोलमध्ये असलेला सूर्यवंशी सिनेमा 24 मार्च रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात सिंबामधील रणवीर सिंग आणि सिंघम सिनेमातील अजय देवगण हेदेखील एन्ट्री मारताना दिसणार आहेत. करण जोहरनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाच्या निमित्तानं अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ ही जोडी तब्बल 9 वर्षांनंतर पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे.