कांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या ‘कांद्या’शिवाय बनवता येणाऱ्या 5 ‘रेसिपी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कायम आपल्या ट्विट्समुळे चर्चेत राहणारे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ट्विटरवर ते व्यंगात्मक स्वरुपात ट्विट करतात. ट्विंकलने आज असाच एक ब्लॉग सोशल मिडियावर शेअर केला आहे. कांद्याच्या किंमतीबाबत हा ब्लॉग शेअर करण्यात आला आहे.

या ब्लॉगमध्ये तिने कांद्याची तुलना बाजारात खूप महाग मिळणारे फळ ‘अवाकाडो’शी केली. एका वेबसाइटसाठी लिहिलेल्या या ब्लॉगमध्ये ट्विंकलने कांद्याच्या किंमतीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावर आपल्या अनोख्या अंदाजात व्यंग केला.

तिने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर व्यंग करताना म्हणले की, बरं झालं की निर्मला सीतारामन यांनी फ्रांसच्या राणी मेरी एंतोने सारखं नाही सांगितले, जर कांदा महाग झाला असेल तर कांदा भजी खा.

ट्विंकल खन्ना एवढ्यावर थांबली नाही तर तिने ब्लॉगवर गुगल सर्च केल्यानंतर पाच अशा रेसिपी शेअर केल्या की जे कांद्याशिवाय बनवतात येतात. या रेसीपीमध्ये पावभाजी, चिकन करी, वांग्याचे भरीत आणि मटन किमा सहभागी आहे.

Visit : Policenama.com

 

You might also like