Sushant Singh Rajput Case : सुशांत केसवर CM ठाकरेंनी पहिल्यांदाच सोडलं ‘मौन’ ! म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणावर आजवर अनेक दिग्गज स्टार आणि नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु गेल्या 5 महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या प्रकरणी मौन धारण केलं होतं. या केसचा तपास सुरू असताना जेव्हा मुंबई पोलिसांना (Mumbai Police) या प्रकरणी घेरलं गेलं तेव्ही ठाकरेंनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता त्यांनी सुशांत केसवरील मौन सोडलं आहे.

शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये सीएम उद्धव ठाकरेंची मुलाखत छापून आली आहे. यात त्यांनी सुशांतच्या निधनावरून राजकारण करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सीएम उद्धव ठाकरे म्हणाले, या घटनेबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. दुर्दैवी आहे की, एकाचा जीव जातो आणि तुम्ही यावरून राजकारण करता. आणखी किती खाली पडणार आहात. ही राजकारण करण्याची सर्वांत गलिच्छ पातळी आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली .

ते म्हणतात, जर तुम्हाला स्वत:ला मर्द म्हणून घ्यायला आवडत असेल, तर मर्द बना. मृत व्यक्तीवरून राजकारण करून तुम्ही 2 मिनिटांची प्रसिद्ध मिळवताय. हेच तुमचं खरं व्यक्तिमत्त्व आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.