Birthday SPL : आमिर खानच्या गाण्यानं उदित नारायणला मिळवून दिला होता पहिला अवॉर्ड ! पहा त्यांची 10 अप्रतिम गाणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूडमधील फेमस सिंगर उदित नारायण (Udit Narayan) यांच्या आवाजाचे गेल्या अनेक दशकांपासून लोक चाहते आहेत. आज उदित त्यांचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज आपण त्यांच्या आयुष्यातील काही इंटरेस्टींग गोष्टी जाणून घेणार आहोत.

उदिय नारायण याचा जन्म 1955 साली अशा कुटुंबात झाला होता ज्याचं नात भारत आणि नेपाळ दोन्ही देशांसोबत होतं. त्यांनी नेपाळी सिनेमातून सिंगिंग करिअरची सुरुवात केली होती. तिथं खास काही न जमल्यानं उदित 1978 साली मुंबईत आले.

उन्नीस बीस या सिनेमातून त्यांनी बॉलिवूड सिंगिंग डेब्यू केला. परंतु आमिर खानच्या एका गाण्यानं त्यांचं नशीब उजळलं. आमिरचा डेब्यू सिनेमा कयामत से कयामत तक मध्ये उदित यांनी एक गाणं गायलं आणि उदित रातोरात स्टार झाले. याच गाण्यामुळं त्यांना बेस्ट प्लेबॅक सिगंरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

यानंतर त्यांनी अनेक हिट साँग दिले. उदित यांची काही उत्तम गाणी-

वीर जारा – मै यहां हूं

डर – तू मेरे सामने

राजा हिंदुस्तानी – आए हो मेरी जिंदगी में

दिल तो पागल है – भोली सी सूरत

पाप कहते है – घर से निकलते ही

कभी हां कभी ना- दीवाना दिल दीवाना

कहो ना प्यार है – कहो ना प्यार है

चोरी चोरी चुपके चुपके – देखने वालों ने क्या क्या नहीं देखा होगा

https://youtu.be/_dUAVM5ERXA

तेरे नाम – तुमसे मिलना

उदित नारायण यांनी अनेक भाषेत जबरदस्त हिट गाणी दिली आहेत. त्यांच्या अप्रतिम आवाजासाठी त्यांना 3 वेळा नॅशनल अवॉर्डही मिळाला आहे.

 

You might also like