‘या’ मराठमोळया अभिनेत्रीनं दिलं कंगनाला जबरदस्त उत्तर, म्हणाली – ‘तुम्हाला तर माहितीय ना हिमाचल प्रदेश ड्रग्सचा गड आहे’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते ज्यात ती म्हणाली होती की इंडस्ट्रीतील 99% लोक ड्रग्ज घेतात. त्याअगोदर कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशीही केली. कंगनाच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कंगणाच्या या वक्तव्याचा अनेक सेलेब्रिटींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोधही केला आहे. नुकतीच अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन आणि हेमा मालिनी यांनीही कंगणाच्या या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि मुंबई आणि चित्रपटसृष्टीविरूद्ध काहीच खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले. आता उर्मिला मातोंडकर यांनीही कंगनाच्या या दाव्याला लक्ष्य केले आहे.

इंडिया टुडेच्या वेब चॅनल मुंबई तकमध्ये बोलताना उर्मिला म्हणाली, “संपूर्ण देश ड्रग्जच्या झळा सोसत आहे.” हिमाचल हा ड्रग्सचा गड आहे हे कंगनाला ठाऊक आहे का? तिने हा लढा तिच्या राज्यपासून सुरू करावा. ” उर्मिला पुढे बोलताना म्हणाली, “ज्या व्यक्तीला करदात्याच्या पैशाने वाय-सुरक्षा दिली गेली आहे, तो ड्रग लिंकची माहिती पोलिसांना का देत नाही?” मुंबई प्रत्येकाची आहे यात काही शंका नाही. ज्याने शहरावर प्रेम केले आहे त्यास शहराचे प्रेम प्राप्त झाले आहे. मुंबई शहराविरूद्ध केलेला एक अपमानही मी सहन करणार नाही. जेव्हा आपण असे विधान करता तेव्हा आपण शहराचा अपमान करत नाही तर तेथे राहणाऱ्या मोठ्या संख्येने लोकांचा अपमान करता.

कंगना राणावत 9 सप्टेंबर रोजी मुंबईला गेली होती. पण आता ती पुन्हा मनालीतील तिच्या घरी पोहोचली आहे. परंतु कंगना ट्विटरवर सतत सक्रिय राहते आणि तिला लक्ष्य करणाऱ्या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला ती प्रत्युत्तर देत असते.