Trailer Out : कधी न ऐकलेला विचित्र कुंडली दोष घेऊन येतेय ‘व्हर्जिन भानुप्रिया’ उर्वशी रौतेला ! ‘या’ दिवशी रिलीज होणार सिनेमा (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार उर्वशी रौतेला स्टारर व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या या सिनेमाची खूप चर्चा होत आहे. सोशलवर सध्या ट्रेलरही खूप चर्चेत आहे. यात उर्वशीची भूमिका असा काही कुंडली दोष घेऊन आली आहे ज्याबद्दल तुम्ही कधीच ऐकलं नसेल.

काय आहे उर्वशीतीच्या कुंडलीतील दोष ?

व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात उर्वशीसोबत बिग बॉस फेम गौतम गुलाटी दिसणार आहे. ट्रेलरमधून समजतं की, ज्योतिषी सांगत आहे की, भानुप्रिया म्हणजेच उर्वशीच्या कुंडलीत एक दोष आहे. याला योनी त्रुटी योग सांगितलं जात आहे. यामुळं ती संबंध ठेवू शकत नाही. जोतिषाचं हे बोलणं ऐकून सारेच अवाक् होतात.

काय आहे ट्रेलरमध्ये ?

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, भानुप्रिया ही खूप साधी सुधी मुलगी आहे. जिला मुलांना अप्रोच करायला खूप लाजल्यासारखं होतं. तिची खास मैत्रीण तिला कायमच नवीन नवीन युक्त्या सांगत असते. भानुप्रियाचं अखेर लग्न ठरलेलं असतं. परंतु अचानक नवरा मुलगा पळून गेल्याची बामती कळते.

कधी होणार रिलीज ?

व्हर्जिन भानुप्रिया हा सिनेमा 16 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Zee 5 वर रिलीज होणार आहे. अजय लोहाननं हा सिनमा डायरेक्ट केला आहे. व्हर्जिनु भानुप्रिया सिनेमात गौतम गुलाटी, उर्वशी रौतेला, अर्चना पूरण सिंह, डेलनाज इराणी, राजीव गुप्ता, ब्रिजेंद्र काला, निकी अनेजा आणि रुमाना मोला असे कलाकार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like