Video : उर्वशी रौतेलानं हनी सिंगसह केला स्ट्रीप डान्स, सोबतच केली ‘Love Dose 2’ ची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा नवीन संगीत अल्बम ‘एक लड़की भीगी भीगी सी’ चर्चेत होता. या व्हिडिओमधील त्यांचा लाल साडीमधील लूक चाहत्यांना फार आवडला होता. गाण्याच्या व्हिडिओला युट्युबवर लाखो व्युज मिळाले असून आता उर्वशी तिच्या दुसऱ्या व्हिडिओबद्धल चर्चेत आहे. जे त्यांनी नुकतेच इंस्टाग्रामवर शेर केले आहे.

या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला स्ट्रीप डान्स करताना दिसत आहे. त्यांच्यासोबत व्हिडिओमध्ये रॅपर यो यो हनी सिंग देखील दिसणार आहे. ज्यामध्ये ते त्यांचा हिट नंबर ‘लव डोज’ गात आहेत आणि बाजूला उभे राहून उर्वशी आपले जॅकेट फिरवून फेकत असलयाचे दिसत आहेत. हा व्हिडीओ शेर करताना उर्वशीने त्यांच्या फॅनसाठी मोठी घोषणा केली. ज्यानंतर त्यांचे फॅन खूप खुश झाले.

या व्हिडिओद्वारे अभिनेत्रीने सांगितले आहे की, ती लवकरच ‘लव्ह डोज २’ मध्ये दिसणार आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने लिहले आहे- ‘माझे पहिले स्ट्रेपटीज. किंग लीजेंड हनी सिंगने आमचे आयकॉनिक गाणे लव्ह डोज २ ने स्टेज पेटवून दिला. लव्ह डोज २ लवकरच येणार आहे.

उर्वशी रौतेलाच्या या घोषणेनंतर तिचे चाहते खूप खुश आहेत. याशिवाय उर्वशी रौतेला तामिळ डेब्यूमध्ये जाणार आहे. त्या एक बिग-बजेट sci-fi चित्रपटाचा हिस्सा असणार आहेत. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या पहिल्या तमिळ चित्रपटाची घोषणा केली आहे.