Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : रॉयल असणार ‘वरुण-नताशा’चं हनीमून ! समोर आले डिटेल्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्टर वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) बी टाऊनमधील पॉप्युलर कपल्सपैकी एक आहे. सध्या त्यांच्या या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे. 24 जानेवारी 2021 रोजी दोघं विवाहबद्ध झाले आहेत. अलिबागमधील मेंशन हाऊसमध्ये दोघांनी 7 फेरे घेतले. लग्नबंधनात अडकल्यानंतर आता दोघंही खूप खुश आहेत. दोघांच्या हनीमूनबद्दलही माहिती समोर येत आहे.

लग्नानंतर मुंबईत त्यांची रिसेप्शन पार्टी असणार आहे. यानंतर आता सर्वांना एकच उत्सुकता आहे, ती म्हणजे हनीमूनसाठी नताशा दलाल आणि वरुण नेमके कुठे हनीमूनला जाणार आहेत.

आधी तर असं सांगितलं जात होतं की, वरुण-नताशा आपल्या हनीमूनला जाऊ शकणार नाही, कारण वरुण त्याच्या अपकमिंग सिनेमांची शुटींग सुरू करणार होता. परंतु आता असं बोललं जात आहे की, दोघंही तुर्कीत आपलं हनीमून सेलिब्रेट करतील.

असं समजत आहे की, तुर्कीला सिरागन पॅलेस एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे जे जगातील सर्वात सुंदर आणि महाग हॉटेलपैकी एक आहे. समुद्रकिनारी असलेल्या या अलिशान हॉटेलात ती प्रत्येक सुविधा आहे जी तुमचं व्हॅकेशन अविस्मरणीय करते.

असं सांगितलं जात आहे की, इंस्तानबुल मध्ये हे हॉटेल आहे. आपल्या सुविधांसोबत महागड्या रेटसाठीही हे हॉटेल फेमस आहे.

एका रूमची किंमत 21 हजारानं सुरू होऊन 80 हजारांहून जास्त दिसत आहे. हे जगातील सुंदर लग्जरियस रिसॉर्टपैकी एक आहे. इथं याआधीही अनेक सेलेब्सनं स्टे केला आहे.

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकला आहे. नुकताच वरुण पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अभिनेत्री अली खान प्रमुख भूमिकेत होती. हा सिनेमा ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर 2020 रोजी रिलीज झाला आहे