Varun Dhawan-Natasha Dala wedding : कुटुंबीयांसोबत अलिबागसाठी रवाना झाली वधू नताशा ! (फोटो)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्टर वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) बी टाऊनमधील पॉप्युलर कपल्सपैकी एक आहे. सध्या ते सतत चर्चेत येताना दिसत आहेत. लवकरच दोघं लग्न करणार आहेत. सध्या त्यांच्या या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे. दोघांच्या लग्नाचे विधीही सुरू झाले आहेत. वरुण आणि नताशा 24 जानेवारी रोजी 7 फेरे घेणार आहेत. अलिबागच्या मेंशन हाऊसमध्ये वरुण-नताशा लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळं काही मोजक्याच लोकांना लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे.

नताशा कुटुंबीयांसोबत अलिबागसाठी रवाना झाली आहे. याचे काही फोटोही समोर आले आहेत.

फोटोत दिसत आहे की, तिनं कोरोनापासून सुरक्षा बाळगत मास्कही घातलं आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं क्रीम कलरचा ड्रेस घातला आहे.

24 जानेवारीपर्यंत वरुण आणि नताशा यांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम चालणार आहेत. या दोघांच्या लग्नात बॉलिवूडमधील काही खास परंतु मोजके सेलेब्स असणार आहेत.

असंही सांगितलं जात आहे की, सलमान खान, शाहरुख खान, करण जोहर, अर्जुन कपूर सहित अनेक स्टार या लग्नाला उपस्थित असणार आहेत. अलिबागमध्ये लग्न केल्यानंतर मुंबईत वरुण आणि नताशा यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी असणार आहे.