अभिनेता वरुण आणि नताशा दलालचं लग्न रद्द ? ‘स्ट्रीट डान्सर थ्री डी’ कारणीभूत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार वरुण धवनच्या लग्नाची गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू आहे. असं म्हटलं जात आहे की वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्याचं बोललं जातं होतं. परंतु आता हे रद्द तात्पुरत रद्द झालं असून पुढे ढकलण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजेच नुकताच रिलीज झालेला त्याचा सिनेमा स्ट्रीट डान्सर थ्री डी आहे.

वरुण धवनचा स्ट्रीट डान्सर थ्री डी हा सिनेमा नुकतचा रिलीज झाला. अशी माहिती आहे की, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खास काही चालला नाही. या कारणामुळं वरुणनं आपलं लग्न सध्या रद्द केलं आहे आणि पुढे ढकललं आहे. सध्या तो आपल्या करिअरवर फोकस करणार आहे आणि यानंतर तो लग्नाबद्दल विचार करणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, वरुण धवननं आधी प्लॅन केलं होतं की, तो या वर्षाच्या शेवटी लग्न करेल. परंतु आता सिनेमा खास न चालल्यानं त्यानं विचार बदलला आहे. सध्या तो आपलं करिअर ट्रॅकवर आणण्याचा विचार करत आहे. कारण त्याच्या मागच्या सिनेमानंही खास काही कमाल केली नव्हती. वरुणची गर्लफ्रेंड नताशा दलालनं मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.