Varun Dhawan – Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! ‘या’ कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्टर वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) बी टाऊनमधील पॉप्युलर कपल्सपैकी एक आहे. सध्या त्यांच्या या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे. 24 जानेवारी 2021 रोजी दोघं विवाहबद्ध झाले आहेत. अलिबागमधील द मेंशन हाऊसमध्ये दोघांनी 7 फेरे घेतले. लग्नबंधनात अडकल्यानंतर आता दोघंही खूप खुश आहेत. दोघांच्या हनीमूनबद्दलही माहिती समोर आली आहे. आधी तर असं सांगितलं जात होतं की, वरुण-नताशा तुर्कीत आपलं हनीमून सेलिब्रेट करतील. परंतु आता त्यांनी हनीमीन पोस्टपॉन केल्याचं समजत आहे. ते आता हनीमूनसाठी जाणार नाहीत.

वरुणनं त्याच्या भेडिया या सिनेमामुळं हनीमून पोस्टपॉन केलं आहे. कारण आता या सिनेमाची शुटींग सुरू होणार आहे. या सिनेमाची शुटींग ही अरुणाचल प्रदेशात होणार आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार सिनेमाच्या शुटींगमुळं वरुणनं त्याचं हनीमून पोस्टपॉन केलं आहे. पुढील महिन्यात म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी वरुण-नताशाचं रिसेप्शन आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार या पार्टीत दिसणार आहेत. परंतु आता या डेटवरूनही सवाल केले जात आहेत.

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकला आहे. नुकताच वरुण पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अभिनेत्री अली खान प्रमुख भूमिकेत होती. हा सिनेमा ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर 2020 रोजी रिलीज झाला आहे. आता तो भेडिया सिनेमात झळकणार आहे.