बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का ! ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन

पोलीसनामा टीम –  तब्बल 115 सिनेमात काम करणाऱ्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री कुमकुम यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्या 86 वर्षांच्या होत्या. त्या दीर्घकाळापासून आजारासोबत लढा देत होत्या. कुमकुम यांच्या जाण्यानं बॉलिवूडमध्ये पुन्हा शोककळा पसरली आहे. नावेद जाफरी यांनी सोशलवरून शोक व्यक्त केला आहे.

यांची ट्विट करत लहिलं की, “आपण आणखी एक मौल्यवान हिरा गमावला आहे. मी बालपणासून यांना ओळखतो. त्या आमच्या कुटुंबातील असून कमालीच्या कलाकार आणि एक चांगल्या व्यक्ती होत्या. तुमच्या आत्म्यास शांती लाभो कुमकुम आंटी.”

कोण होत्या कुमकुम ?

कुमकुम यांचा जन्म 22 एप्रिल 1934 रोजी बिहारमधील शेखपुरा(आताचे) येथे झाला होता. त्यांचं मूळ नाव हे जेब उन निसा (Zeb un nissa) होतं. त्यांचे वडिल हुसैनाबादचे नवाब होते. कुमकुम यांना गुरु दत्त यांनी शोधल्याचं सांगितलं जातं. 1954 साली आलेल्या गुरु दत्त यांच्या आर पार सिनेमातील कभी आर कभी पार लागा तीरे नजर हे गाणं त्यांना जगदीप यांना घेऊन करायचं होते. परंतु नंतर त्यांना वाटलं की, कोणत्या तरी स्त्री पात्राला घेऊन हे गाणं करावं. तेव्हा गुरु दत्त यांनी कुमकुम यांना घेऊन गाण्याचं शुटींग केलं. होतं.

कुमकुम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी गुरु दत्त आणि किशोर कुमार यांच्यासोबत काम केलं आहे. मदर इंडिया, कोहिनूर, उजाला, एक सपेरा एक लुटेरा अशा अनेक फेमस सिनेमात त्यांनी काम केलं आहे.