जनता कर्फ्यू : लता मंगेशकरांनी ‘असे’ मानले आभार, अभिनेता अल्लू अर्जुननंही वाजवल्या टाळ्या (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरससोबत लढा देणाऱ्या कोरोना कमांडोप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनीच जनता कर्फ्यु दिनाच्या दिवशी म्हणजे रविवार दि 22 मार्च 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता टाळ्या आणि थाळी वाजवली. यात सामान्यांसोबतच कलाकारांनीही सहभाग घेतला होता. अनेक बॉलिवूड कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यात दिग्गज गायिका लता मंगेशकर, मेगास्टार बिग बी अमतिाभ बच्चन, अक्षय कुमार, करण जोहर यांनीही बाल्कनीत येऊन कोरोना कमांडोंचे आभार मानले. इतरही अनेक कलाकारांची नावं सांगता येतील.

लता मंगेशकर यांनीही ट्विट करत व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आज पुण्यातील मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सायंकाळी 5 वाजता डॉक्टर्स, नर्स आणि सर्वच कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे टाळ्या वाजवत सर्वांचे आभार मानले.”

साऊथ इंडियन सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुन यानंही सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत दिसत आहे की अल्लू अर्जुन त्याच्या कुटुंबियांसोबत घरातील बगीचामध्ये टाळ्या वाजवत आहे. अल्लू अर्जुननंदेखील सर्व कोरोना कमांडोंचे आभार मानले आहेत. अल्लू अर्जुनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.