अभिनेत्री तारा सुतारिया सिद्धार्थ मल्होत्राला नव्हे तर ‘या’ अभिनेत्याला करतेय ‘डेट’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अरमान जैन आणि अनीसा मल्होत्रा यांचा शनिवारी रोका सेरेमनी मुंबईत पार पडला. यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अरमानचा लहान भाऊ आदर जैननं यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पार्टीमध्ये अभिनेत्री तारा सुतारिया आणि आदर जैन खूपच एकमेकांच्या जवळ दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून तारा सुतारिया आणि आदर जैन यांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. शनिवारी झालेल्या पार्टीचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात आदर आणि तारा एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. आदर जैननं रोका सेरेमनीमध्ये तिचं स्वागत केलं. दोघे बराच वेळ सोबत दिसत होते.

तारा आणि आदरचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, तारानं गोल्डन कलरची साडी घातली आहे ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. दोघांची केमिस्ट्रीही पाहण्यासारखी आहे. आदरनं हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना आदर म्हणतो, जेव्हा तुझ्यासोबत असतो तारा.”

याआधी तारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. परंतु तारानं मात्र या वृत्ताचं खंडन केलं होतं.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/