Video : ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबातीचा धक्कादायक खुलासा ! म्हणाला ‘…तेव्हा जीव जायची वेळ आली होती’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वांत मोठा सिनेमा बाहुबली (Baahubali) मध्ये भल्लालदेव ही भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबाती (Rana Daggubati) यानं एका चॅट शोमध्ये असा एक खुलासा केला. ज्यानंतर सारेच चकित झाले आहेत.

चॅट शोमध्ये बोलताना राणानं सांगितलं की, त्यानं आरोग्याशी संबंधित मोठ्या समस्येचा सामना केला आहे. एके काळी त्याची हेल्थ कंडिशन एवढी खराब झाली होती की, त्याचा जीव जायची वेळ आली होती.

सामंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) हिच्या चॅट शोमध्ये राणानं त्याच्या हेल्थबद्दल हे खुलासे केले आहेत. राणाच्या हेल्थबद्दल चकित करणारे खुलासे ऐकल्यानंतर सामंथा आणि चाहते इमोशनल झाले.

राणा म्हणाला, जेव्हा तुमची लाईफ फास्ट फॉरवर्ड चालत असते, तेव्हाच अचानक एक पॉज बटन येतं. मला बीपीचा प्रॉब्लेम होता. माझ्या हार्टच्या चहूबाजूंना कॅल्सिफिकेशन होतं आणि किडनीही फेल व्हायला आली होती. अशात 70 टक्के चान्सेस हे स्ट्रोक आणि हॅमेरजचे होते. आणि 30 टक्के जीव जाण्याचा धोका होता.

याआधीही राणानं त्याच्या डोळ्यांबद्दल खुलासा केला होता. त्यानं सांगितलं होतं की, त्याला उजव्या डोळ्यानं दिसत नाही. त्याला फक्त डाव्याच डोळ्यानं दिसतं. हा डोळादेखील कोणीतरी त्याला मेल्यानंतर डोनेट केला होता. तो सांगतो जर त्यानं डावा डोळा बंद केला, तर तो कोणालाही पाहू शकत नाही असंही तो म्हणाला होता.

राणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच तो हाथी मेरे साथी या सिनेमात काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. आता 2021 मधील मकर संक्रांतीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात पुलकित सम्राट, श्रिया पिळगावकर, जोया हुसैन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अनेक भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.

You might also like