…म्हणून ‘इंडिगो’ एयरलाइन्सवर ‘भडकली’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एअरलाइन्स कंपनी इंडीगोवर सामानाची बॅग तोडल्याचा आरोप केला आहे. सोनाक्षी सिन्हाने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ति तिची बॅग दाखवत असून तिच्या बॅगचे दोन हँडल पूर्णपणे तुटलेले आहेत आणि एक चाक हरवले आहे.

https://twitter.com/sonakshisinha/status/1190959445477474304

सोनाक्षीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ती म्हणते की, ‘धन्यवाद मित्रांनो…आपण ही इंडिगोपासून सुटका करू शकत नाही. ” या विनोदबद्दल सोनाक्षी कडक शब्दांत बोलली असली तरी ती नक्कीच रागात होती. सोनाक्षी काल रात्री हैद्राबादमध्ये सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिजसोबत द-बँग टूरमध्ये होती. एअरलाइन्स व बॅग कंपनीकडून आतापर्यंत कोणतेच उत्तर आले नाही.

सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर ती सैना अली खान यांचा चित्रपट ‘लाल कप्तान’ मध्ये कॅमिओ करताना दिसली होती. त्याचबरोबर ‘मिशन मंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसली होती. ‘खानदानी शफाखाना’ मध्येही ती मुख्य भूमिकेत होती. त्याशिवाय धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट ‘कलंक’ चित्रपटातही ती दिसली होती. सध्या सोनाक्षीकडे दोन मोठे चित्रपट आहेत. अ‍ॅक्शन-कॉमेडी ‘दबंग 3’ मध्ये ती रज्जोच्या भूमिकेत सलमान खानच्या सोबत दिसणार आहे. त्याचबरोबर तिने ‘भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटामध्ये देखील काम करत आहे. यामध्ये अजय देवगन आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सोनाक्षी सिन्हा प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. कौन बनेगा करोडपतीमधील एका प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर तिने ट्रोलिंगला कंटाळून आपली प्रतिक्रिया देखील दिली होती. सोनाक्षी सिन्हाला दोन भाऊ आहे. त्यांचे नाव लव आणि कुश आहे.

https://www.instagram.com/p/BzGFwsGgEIk/

 

Visit : Policenama.com