Fatafati First Look Poster Out : बॉडी शेमिंगवर आधारित चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने अलीकडेच एका मुलाखतीत बॉडी शेमिंगबाबत आपले मत मांडले होते. या मुद्द्यावर आता बंगाली चित्रपटात एक चित्रपट बनवला जात आहे, ज्यात बॉडी शेमिंगविरुद्ध एक मेसेज दिला गेला आहे. ‘फाटाफाटी’ एक स्वतंत्र विचार आणि साहसी महिलेची कथा आहे, जी समाजात बॉडी शेमिंगविरुद्ध एक तगडा मेसेज देते.

चित्रपटाच्या लीड ऍक्टरमध्ये प्लस-साईज फॅशनीस्टाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचा विषय लक्षात घेऊन त्याच्या पोस्टर लाँचसाठी खास महिला दिन निवडला गेला आहे. पोस्टर मॅगझीन कव्हर स्टाईलमध्ये आहे, ज्यावर मेन कॅरॅक्टर दाखवले गेले आहे.

पोस्टर पाहून वाटत आहे की, कॅरॅक्टरमध्ये बसण्यासाठी अभिनेत्रीचे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केले गेले आहे, ज्यासाठी कृत्रिम मेकअपचीही मदत घेतली गेली आहे. पोस्टरवर अनेक प्रेरणादायक संदेश लिहिले गेले आहेत, ज्यात स्वतःला यथास्थिती स्वीकारणे आणि प्रेम करण्यावर जोर देण्यात आला आहे.

निर्मात्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चित्रपट समाजात प्रचलित असलेल्या परफेक्ट बॉडीच्या विश्वासावर हल्ला करतो, ज्यामुळे महिलांना एक मानसिक छळ सहन करावा लागत आहे. त्यांना या आधारे जज केले जाते. बॉडी शेमिंगच्या भीतीमुळे महिलांना समाजात त्यांची स्वीकृती टिकवून ठेवण्यासाठी डाएट आणि व्यायाम करावा लागतो. हे सौंदर्याचे एक मापदंड मानले जाते. चित्रपट याच दृष्टिकोनाला बदलण्यावर भर देतो.

‘फाटाफाटी’ची निर्मिती नंदिता रॉय आणि शिबोप्रोसाद मुखर्जी करत आहेत, जे महिला प्रधान चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. विंडोज प्रॉडक्शन अंतर्गत २०१९ च्या महिला दिनानिमित्त त्यांचा चित्रपट Mukherjee Dar Bou प्रदर्शित झाला होता, तर २०२० मध्ये Brahma Janen Gopon Kommoti प्रदर्शित झाला होता. ‘फाटाफाटी’चे दिग्दर्शन अरित्रा मुखर्जी करत आहेत. कथा जिनिया सेन यांनी लिहिली आहे, तर संवाद लेखन समरागणी बंधोपाध्याय यांनी केले आहे.