Master OTT Release : थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता Amazon Prime वर रिलीज होणार ‘मास्टर’ ! जाणून घ्या तारीख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजय (Vijay) आणि विजय सेथुपती (Vijay Sethupathi) यांचा मास्टर (Master) हा सिनेमा 13 जानेवारी 2020 रोजी सिनेमाहॉलमध्ये रिलीज झाला. एकाच आठवड्यात सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. लोकांना हा सिनेमा एवढा आडवत आहे की, कोरोनाचं संकट असूनही लोक थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पहात आहेत. खास बात अशी आहे की, आता ॲमेझॉन प्राईम व्हिडीओनं आज या थ्रिलर सिनेमाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा केली आहे जो 29 जानेवारी रिलीज होणार आहे.

सिनेमातील कास्टींगबद्दल बोलायचं झालं तर यात विजय आणि विजय सेथुपती यांच्या व्यतिरीक्त मालविका मोहनन, एंड्रिया जेरेमिया, शांतनु भाग्यराज, अर्जुन दास प्रमुख भूमिकेत आहेत.

आता या सिनेमाचा ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर 29 जानेवारी 2021 रोजी डिजिटल प्रीमियर होणार आहे.

मास्टर हा एक तमिळ सिनेमा आहे. हा सिनेमा तेलगू सोबतच हिंदी भाषेतही रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा जबरदस्त असल्याचं अनेकांनी सोशलवर म्हटलं आहे. विजयच्या दमदार अभिनयाचंही खूप कौतुक होताना दिसत आहे. या सिनेमात भरपूर ॲक्शन दिसत आहे. याची स्टोरीही प्रेक्षकांना आवडल्याचं सांगितलं जात आहे.