अभिनेत्री काजोल पार्टीतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्याच कारमध्ये बसू लागली, एवढ्यात…(व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री काजोल सध्या आपल्या आगामी सिनेमा तान्हाजी द अनसंग वॉरियरच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशलवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. काजोल एका पार्टतून बाहेर पडते आणि दुसऱ्याच कारमधून बसून लागते. एवढ्यात तिच्या सोबतचे तिला सांगतात की, तिची कार पुढे उभी आहे. नंतर ती आपल्या कारमध्ये जाते आणि हसते.

सध्या सोशलवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सुजैन खानच्या घरी झालेल्या पार्टी सेलिब्रेशनचा आहे. यात दिसत आहे की, पार्टीनंतर काजोल बाहेर येते. चाहत्यांना प्रतिसाद देत ती आपल्या कारच्या दिशेनं जाते. तेवढ्यात तिला फोटोग्राफर्स सांगतात की, तुझी कार पुढे उभी आहे. नंतर काजोलच्याही लक्षात येत की, ती दुसऱ्याच कारकडे जात होती. ती स्वत:देखील हे बोलून दाखवते.

काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर दीर्घकाळानंतर ती पती अजय देवगनसोबत तान्हाजीच्या निमित्तानं स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमातही तिनं अजयच्या म्हणजेच तान्हाजींच्या पत्नीची-सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/