The Disciple : मराठी चित्रपट ‘द डिसायपल’नं जिंकला ‘हा’ पुरस्कार, जाणून घ्या कथा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नुकतेच इटलीमध्ये झालेल्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला फेडरेशन इंटरनॅशनल डे ला प्रेस सिनेमॅटोग्राफी आणि सर्वोत्कृष्ट पटकथा हा पुरस्कार मिळाला. याचे लेखक आणि दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे आहेत. ‘द डिसायपल’ला पुरस्कार मिळणे आणखीनच महत्वपूर्ण आहे, कारण १९ वर्षांनंतर या चित्रपट महोत्सवात एखाद्या भारतीय चित्रपटाने पुरस्कार जिंकला आहे.

यापूर्वी २००१ मध्ये मीरा नायर यांचा चित्रपट ‘मानसून वेडिंग’ला या महोत्सवाच्या ‘द गोल्डन लायन’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ‘द डिसायपल’चे कार्यकारी निर्माता अल्फान्सो कुओरोन आहेत, जे हॉलिवूड चित्रपट ‘ग्रॅविटी आणि रोमा’चे दिग्दर्शक आहेत. चित्रपटाची कथा एका तरुण गायकाची आहे, ज्याला आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा लाभला आहे. चैतन्य यांनी चित्रपटाशी संबंधित विषयांवर भाष्य केले.

जागतिक स्तरावर कौतुक झाल्याने स्वतंत्र सिनेमाचा मार्ग किती सुलभ झाला आहे? असे विचारले असता ते म्हणाले की, भारतीय सिनेमासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे असे मला वाटते. याला दोन पुरस्कार मिळणे खूप चांगले संकेत आहेत. लोकांना माहित असावे की, या देशात वेगवेगळे चित्रपट बनत आहेत.

तुम्ही या उत्सवात भाग घेण्यास गेला होता का, असे विचारले असता ते म्हणाले की, जोपर्यंत मुंबईहून फ्लाइट टेकऑफ झाली नाही , तोपर्यंत तिथे पोहोचू नाही याची खात्री नव्हती. आम्ही चित्रपटाच्या प्रीमिअरला हजर होतो.

तिथे चित्रपटगृह खोलण्याबाबत घेतलेल्या खबरदारीबाबत ते म्हणाले की, प्रत्येकाने मास्क घातले होते. थर्मल स्क्रीनिंग घेतली जात होती आणि लोक एक जागा सोडून बसत होते.

‘द डिसायपल’बद्दल सांगताना ते म्हणाले की, आम्हाला शास्त्रीय संगीतकारांचे किस्से ऐकायला मिळाले. या घटनांनी खूप आकर्षित केले.

त्यांचे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफर मायकल सोबोकिन्सकी यांच्याबद्दल ते म्हणाले की, माझे गुरू अल्फान्सो कुओरोन यांनी त्याचे नाव सुचवले. मायकलने मुंबईत बर्‍याच जाहिरातींचे शूट केले होते आणि इथल्या वातावरणाविषयी त्याला चांगली माहिती होती.

अल्फान्सोबद्दल ते म्हणाले की, रोलेक्सचा एक मेन्टॉर प्रोटेजी आट्र्स इनिशिएटिव्ह उपक्रम असतो. हा कार्यक्रम दर दोन वर्षांनी असतो. यामध्ये गुरु स्वतः त्याच्या शिष्याची निवड करतो. मला या कार्यक्रमाबद्दल माहित होते. अल्फान्सो त्या वर्षाचे गुरु होते. मी त्यांच्या ‘रोमा’ चित्रपटाच्या सेटवर गेलो आणि त्यांच्या कामाच्या शैलीची ओळख करून घेतली. त्यांनी ‘द डिसायपल’ ची स्क्रिप्ट वाचली. त्यांना ती इतकी आवडली की, ते म्हणाले तुला पाठिंबा देण्यासाठी मी कार्यकारी निर्माता म्हणून सामील होऊ इच्छितो. हा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी संपला, पण आमची मैत्री कायम राहिली.