Vishnu Vishal And Jwala Gutta Engagement : ज्वाला गुट्टा आणि विष्णु विशाल यांनी केला साखरपुडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपट अभिनेता विष्णू विशाल आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांनी साखरपुडा केला आहे. अभिनेत्री ज्वाला गुट्टाच्या वाढदिवशी अधिकृतपणे साखरपुडा केला आहे. अभिनेत्याने आपल्या ट्विटरवर प्लेयरसोबत फोटो शेअर करुन याबद्दलची माहिती दिली आहे आणि विष्णूने ज्वाला गुट्टाला घातलेल्या अंगठीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. खरतर दोघेही बर्‍याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि आता साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी म्हणजेच ७ सप्टेंबरला ज्वाला गुट्टाचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टाने चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

दोघांनीही यापूर्वीच आपल्या नात्याबद्दल सांगितले आहे आणि बर्‍याचदा सोशल मीडियावर या दोघांचे फोटोही असतात. ज्वाला गुट्टाही तिच्या इंस्टाग्रामवर विष्णूसोबतचे फोटो शेअर करत असते. विष्णूने ज्वालासह साखरपुडा करण्यासह तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्या अंगठीचाही फोटो आहे, जी त्याने घातली आहे. फोटो शेअर करताना विष्णू विशालने लिहिले- ‘हॅपी बर्थडे ज्वाला गुट्टा. आयुष्याची सुरुवात. या आपण पॉझिटिव्ह राहून आपल्या आर्यन, आपले कुटुंब आणि मित्र यांच्या चांगल्या भविष्यासाठी काम करूया. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.’

याशिवाय ज्वाला गुट्टाच्या मॅनेजरचे आभार मानले आहे, ज्याने या अंगठीची मध्यरात्री व्यवस्था केली आहे. या पोस्टमध्ये आर्यनचाही उल्लेख आहे. विष्णूने आधी रजनी नटराजसोबत लग्न केले होते आणि त्यांना आर्यन नावाचा मुलगा आहे. विष्णू आणि रजनी यांचे २०१० मध्ये लग्न झाले होते आणि दोघे २०१८ मध्ये वेगळे झाले. तेव्हापासून विष्णू आणि ज्वाला नात्यात आहेत. तसेच ज्वाला गुट्टाने यापूर्वी चेतन आनंदशी लग्न केले होते आणि त्यांचे नाते २००५ ते २०११ दरम्यान चालले होते.

कादान या चित्रपटात विष्णू दिसणार आहे, त्यात राणा डग्गुबती देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू सोलोमन करत आहेत. हा चित्रपट हिंदीमध्येही हाथी मेरे साथी या नावाने प्रदर्शित होणार आहे.