‘हा’ अभिनेता म्हणतो , ‘मुस्लिम असल्याने मिळत नाही घर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ओन्ली फॉर सिंगल्स या नवीन वेब सीरीजमध्ये लिड रोल साकारणारा अभिनेता विवान शाह याचं असं म्हणणं आहे की, त्याच्या अनेक मित्रांना घर शोधण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण आपण अशा समाजात रहातो जो रुढीवादी आहे. येथे अविवाहित लोकांना घर देण्याबाबत घर मालकांची हरकत असते. त्याच्या शो ची गोष्टही मित्रांच्या अशा ग्रुपवर आधारीत आहे जे सिंगल आहेत त्यांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विवानला एका अशा मोठ्या समस्येबाबत विचारण्यात आलं ज्याचा सामना सिंगल मुलं आणि मुलींना करावा लागतो.

यावर बोलताना विवान म्हटला की, “मी थेट कोणत्या समस्येला सामोरा गेलेलो नाही परंतु हे नक्की पाहिलं आहे की, माझ्या सिंगल मित्रांना घर शोधण्यासाठी कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागला आहे. खास करून दिल्लीमध्ये. मी दिल्लीमध्ये शिक्षण घेतले आहे. दिल्लीतील काही घरमालकांना मुस्लिमांना घर भाड्याने देण्यास अडचण आहे.”

पुढे बोलताना विवान म्हणतो की, “माझे काही मित्र आहेत ज्यांची नावे मुस्लिम आहेत, त्यामुळे त्यांचे नाव कळल्यानंतर त्यांना भाड्याने घर देण्यास अनेकांनी नकार दिला. माझे नाव विवान आहे जे खूप धर्मनिरपेक्ष वाटते, म्हणून मला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही.

विवानच्या शो बद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये विवान ९ ते ५ नोकरी करणाऱ्या नॉवल आर्टीस्टचा रोल करत आहे. हा शो २८जूनपासून मॅक्स प्लेअरवर सुरु झाला आहे. या शोची गोष्ट पाहिल्यानंतर अनेक तरुण ही गोष्ट स्वत:शी रिलेट करतील.

‘या’ घरगुती उपयांनी करा चेहरा मॉइश्चरायईज

‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड