वाजिद खानचा ‘हा’ व्हिडीओ सोशलवर होतोय व्हायरल, हॉस्पिटलमध्ये ‘असं’ गायलं गाणं ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध सिंगर आणि कंपोजर वाजिद खानचं निधन झालं आहे. वाजिद खान किडनीच्या आजारानं ग्रस्त होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. रविवारी (दि 31 मे) त्याची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्याला चेंबूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या निधनानंतर अजून लोक सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना दिसत आहे. वाजिदचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यावरून दिसत आहे की, वाजिद खान किती उत्साही माणूस होता.

वाजिद खानचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका हॉस्पिटलमधील आहे. व्हिडीओत दिसत आहे की, वाजिद बेडवर बसला आहे. तो आजारी असतानाचा हा व्हिडीओ आहे. यात दिसत आहे वाजिद मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं दबंग सिनेमातील गाणं गात आहे. खास बात अशी की हे गाणं तो साजिदसाठी गात आहे.

या व्हिडीओत हॉस्पिटलमधील इतर पेशंटही दिसत आहेत. अद्याप ही गोष्ट कंफर्म झालेली नाही की, हे गाणं आताचं आहे की, पूर्वीचं आहे. कारण व्हिडीओ शेअर करतानाच असं सांगितलं आहे की, हा व्हिडीओ जुना आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like