प्रियंका चोपडा आणि ऐश्वर्या रायपेक्षा कमी यशस्वी असण्याबद्दल विचारलं असता सुष्मिता सेननं दिलं ‘हे’ उत्तर ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुष्मिता सेन डिज्नी प्लस हॉटस्टारवरील वेब सीरिज आर्यामधून अ‍ॅक्टींगमध्ये वापसी करणार आहे. नुकताच (शुक्रवार दि 5 जून 2020) आर्या या सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एका गृहिणीपासून तर गँगस्टर बनण्यापर्यंतचा प्रवास यात पाहायला मिळत आहे. नुकताच सुष्मिताचा एक जुना व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाला आहे. यात पत्रकार सुष्मिताला विचारतो की, प्रियंका चोपडा आणि ऐश्वर्या रायच्या तुलनेत तू कमी मिळवलं आहेस यावर काय सांगशील. सुष्मिता सेननं याला खूप छान उत्तर दिलं आहे. सुष्मिता, प्रियंका आणि ऐश्वर्या यांच्यात एक साम्य आहे की, तिघीही बॉलिवूडमध्ये येण्याआधी ब्युटी पेजेंटच्या विजेता होत्या.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे प्रियंका चोपडा आणि ऐश्वर्या रायसोबत तिची तुलना केली जात आहे. पत्रकार सुष्मिताला म्हणत आहेत की, प्रियंका आणि ऐश्वर्याच्या तुलनेत तिनं खूप कमी मिळवलं आहेस. पत्रकाराला टोकत सुष्मिता सेन म्हणते, “खूप कमी खरं तर प्रियंकानं आपल्यासाठी जे केलं आहे ते खूप कमी लोकांनी केलं आहे. तिंन आपल्याला अभिमान वाटेल असं केलं आहे.”

https://www.instagram.com/p/CBPNeq9HnEc/?utm_source=ig_embed

यानंतर पत्रकार पुढे बोलताना प्रिंयका आणि ऐश्वर्याबद्दल विाचरल्यानंतर सुष्मिता त्याला करेक्ट करत म्हणाली, “जी मझ्यानंतर लारा दत्ता मिस युनिव्हर्स बनली आहे. दुर्दैवानं त्यानंतर आपली कोणी बनलीच नाही. परंतु आता बनेल. कारण आता आपला टाईम आला आहे.”

सुष्मितानं 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. ऐश्वर्या आणि प्रियंकानं क्रमश: 1994 आणि 2000 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. सुष्मिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2010 मध्ये आलेल्या नो प्रॉब्लेम सिनेमात ती शेवटची दिसली होती. 2015 साली आलेल्या निर्बाक या सिनेमातून तिनं बंगाली सिनेमात डेब्यू केला होता. हा सिनेमा श्रीजीत मुखर्जीनं डायेरक्ट केला होता. आता ती आर्या या वेब सीरिजमधून कमबॅक करत डिजिटल डेब्यू करत आहे.