Video : आलियाने केली स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात , शाहरुख खान सोबत पहिला चित्रपट ‘डार्लिंग’ची केली घोषणा

पोलीसनामा ऑनलाईन : निर्माता बनल्यानंतर आलिया भट्टने आपल्या पहिल्या होम प्रॉडक्शन फिल्मची घोषणा केली आहे. याचा टीजर तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात आलियाने आपल्या पहिल्या होम प्रॉडक्शन फिल्ममध्ये डार्क कॉमेडी विषय निवडल्याचे पहिले जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे आलीया पहिल्या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान सोबत मिळून करत आहे. दरम्यान, आलिया आणि शाहरुख सोबत काम करण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही दोघे ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात एकत्र पाहायला मिळाले होते.

आलियाने ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा करताना लिहिले कि, ‘हे खूप खास आहे. ‘एटरनल सनशाइन प्रॉडक्शन अंतर्गत माझे पहिले प्रॉडक्शन ‘डार्लिंग’ ची घोषणा करत आहे , तेही आपल्या आवडत्या शाहरुख खान सोबत. यासह या पोस्टमध्ये आलियाने चित्रपटाच्या स्टारर बाबत खुलासा केला. जसमीत के रीन दिग्दर्शित या डार्लिंग चित्रपटात आलियासोबत शेफाली शाह, विजय शर्मा, रोशन मॅथ्यू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. टीझरची सुरुवात वैधानिक चेतावणीने होते -‘ स्त्रियांचा अपमान करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते.’

शाहरुखने देखील टीजर शेअर करत म्हंटले कि – ‘ डार्लिंग्स, ज़िंदगी मुश्किल है, लेकिन आप भी मजबूत हैं। अपनी डार्लिंग्स को दुनिया के सामने पेश करते हुए… सावधान रहना की सलाह दी जाती है। शाहरुखने पीएसमध्ये लिहिले कि – ‘यह कॉमेडी थोड़ी डार्क है’

आलिया भट्टने 2016 मध्ये शाहरुख खान सोबत डिअर जिंदगी या चित्रपटात काम केले होते. शाहरुखने यात मानशास्त्रतज्ज्ञाची भूमिका साकारली होती, तर आलिया सिनेमोटोग्राफरच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. चित्रपट आलियाच्या लव्ह लाइफच्या उतार- चढावाशी संबंधित होता. चित्रपटाची निर्मिती गौरी खान, करणं जोहर आणि गौरी शिंदेने केली होती. दरम्यान, आलिया सध्या आपला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट 30 जुलैला रिलीज करण्यात येणार आहे.