ईशा अंबानीच्या ‘होळी’च्या पार्टीत निक जोनासनं प्रियंकाच्या ड्रेसला पुसला ‘हात’, व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा आणि तिचा पती हॉलिवूड सिंगर निक जोनास नुकतेच एका होळीच्या पार्टीत सहभागी झाले होते. ईशा अबांनीनं ही पार्टी होस्ट केली होती. या ग्रँड इव्हेंटमध्ये अनेकांनी भाग घेतला होता. इवहेंटमधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहतेही हा अंदाज पाहून खुश होताना दिसत आहेत.

प्रियंक चोपडानं आपल्या इंस्टावरून होळीचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. एकानं व्हिडीओनं खास लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओत दिसतंय की, निक जोनास प्रियंकाच्या ड्रेसला आपले हात पुसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पीसी (प्रियंकानं) मजेदार कॅप्शन दिलं आहे. प्रियंकानं लिहिलं की, “टॉवेलची गरज कुणाला आहे ?”

प्रियंका आणि निकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. दोघांनीही या होळीच्या पार्टीत खूप आनंद लुटला आहे. चाहत्यंनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. त्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर दोघांनीही व्हाईट ड्रेस घातला होता.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे.