अभिनेत्री जान्हवी कपूरचा नाशिकमध्ये ‘झिंगाट’ डान्स (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर अलीकडेच तिच्या एका फोटोशुटमुळे चर्चेचा हिस्सा बनली होती. या फोटोशुमधील जान्हवीचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसले होते. ज्यात जान्हवी निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये होती. यानंतर पुन्हा एकदा तिचा डान्स व्हिडीओ समोर आल्यानंतर ती चर्चेत आली आहे. नुकतीच ती एका कार्यक्रमासाठी नाशिकला गेली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी तिनं फेमस गाणं झिंगाटवर डान्सही केला.

जान्हवीचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात जान्हवी कपूर सैराट या मराठी सिनेमातील फेमस गाणं झिंगाटवर तुफान डान्स करताना दिसत आहे. जान्हवीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे. चाहत्यांना जान्हवीचा झिंगाट डान्स खूप आवडला आहे. अनेकांनी जान्हवीच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स करत तिच्या डान्सचं कौतुक करत आहे.

जान्हवीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पिवळ्या रंगाचा अनारकली सूट घातला होता. या अनारकली सूटमध्ये जान्हवी खूपच क्युट आणि सुंदर दिसत होती. चाहत्यांनी तिच्या लुकचंही कौतुक केलं आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती ‘घोस्ट स्टोरीज’ या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. या सनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसेल. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलल्या गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही ती काम करणार आहे. याशिवाय तिच्याकडे तख्त हा सिनेमादेखील आहे.