रिया चक्रवर्ती नंतर जिया खानबरोबर महेश भट्टचा व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीसोबत दिसले होते. त्या व्हिडिओमध्ये महेश भट्ट यांनी एक विचित्र कृती केली होती, त्यानंतर लोकांनी महेश भट्ट आणि रियावर संताप व्यक्त केला आणि चांगलेच ऐकवले. रिया नंतर आता महेश भट्ट यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात ते दिवंगत अभिनेत्री जिया खानसोबत दिसत आहे.

असे म्हंटले जात आहे की, या व्हिडिओच्या वेळी, जियाचे वय 16 वर्षे असावे. या व्हिडिओमध्ये काहीतरी विशेष ऐकू येत नाही, परंतु स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, महेश भट्ट आणि जिया एकमेकांशी काही बोलत आहेत, त्याचवेळी दिग्दर्शकाने जियाचा हात पकडला आणि आपली बोटे तिच्या बोटांत फसवतात. त्यांनतर जिया मोठ्याने हसते आणि तिचे डोके त्यांच्या खांद्यावर टेकवते. महेश भट्ट यांच्या या व्हिडिओवर लोक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

https://www.instagram.com/bollywoodmedialove/?utm_source=ig_embed

दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर महेश भट्टला बरेच ट्रोल केले जात आहे. असा विश्वास आहे की रिया आणि महेश यांच्यात काही संबंध आहे. महेश भट्टच्या सांगण्यावरून रिया सुशांतशी ब्रेकअप करुन घरातून निघून गेली. काही दिवसांपूर्वी दोघांचे चॅटही समोर आले. चॅट त्याच दिवशीची म्हणजेच 14 जूनची होती ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला. या चॅटमध्ये महेश भट्टने रियाला फोटोसह इंग्रजीचा कोट पाठवला . ज्याला रियानेही प्रत्युत्तर दिले. मात्र, महेश भट्ट आणि रियाच्या या गप्पांना पूजा भट्ट यांनी फॉरवर्ड मॅसेज म्हंटले आहे. तिचे म्हणणे आहे की, हा संदेश वडिलांनी तिलाही पाठविला होता. दरम्यान, सुशांतने 14 जून रोजी आपल्या मुंबईच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणी आता सीबीआय चौकशी सुरु आहे.