Nora Fatehi Belly Dance Video : ‘भाईजान’ सलमानच्या गाण्यावर नोरा फतेहीचा जबरदस्त ‘बेली डान्स’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्ससाठी खूपच फेमस आहे. नोरा अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ सोशलवरून शेअर करत असते जे व्हायरल होताना दिसत असतात. याशिवाय आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळंही नोरा चर्चेत येत असते. सध्या नोराचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे. यात नोराचा जबरदस्त बेली डान्स पाहायला मिळत आहे.

नोराचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात नोरा स्वॅग से स्वागत (Swag Se Swagat) गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरीना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर जिंदा है (Tiger Zinda Hai) सिनेमातील हे गाणं आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं लाल कलरचा ड्रेस घातला आहे. यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिनं केलेला बेली डान्स चाहत्यांना खूप आवडला आहे. अद्याप लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

सध्या नोराचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. चाहत्यांची तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत. नोरा आपल्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते. रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय क्रेझी कुक्कड फॅमिली या सिनेमातही तिनं काम केलं आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर खास काही चालले नाहीत.