जेव्हा देसी गर्ल प्रियंकानं जॉन ट्रॅव्होल्टासोबत केला ‘तूने मारी एन्ट्री’ गाण्यावर जबरदस्त डान्स ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा हिचा एक जुना व्हिडीओ समोर आल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यात प्रियंका आणि जॉन ट्रॅव्होल्टा गुंडे सिनेमातील तूने मारी एन्ट्री गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. प्रियंका आणि ट्रॅव्होल्टाचा हा व्हिडीओ 2014 च्या IIFA अवॉर्ड समारंभातील आहे. यात जॉन ट्रॅव्होल्टा आणि केविन स्पेसी असे कलाकार सहभागी झाले होते. फ्लोरिडाच्या टॅम्पामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं.

https://www.facebook.com/watch/?v=266578701391671

या समारंभात हॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांनी सहभाग घेतला होता. समोर आलेल्या व्हिडीओत जॉन आणि प्रियंका जबरदस्त डान्स करत आहेत. खास बात अशी की, यात दोघंही देसी डान्स स्टेप्स मॅच करत आहेत. दोघांचा डान्स बघून अनेक बॉलिवूड स्टार्सही हैराण झाले होते.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like