बॉयफ्रेंडला ‘कंट्रोल’ करण्याबद्दल बोलतानाचा रिया चक्रवर्तीचा व्हिडीओ ‘लीक’ !

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रिया चक्रवर्तीचा एक चकित करणारा व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रिया बॉयफ्रेंडला कंट्रोल करण्याबद्दल बोलत आहे. तसं तर तिनं व्हिडीओत कोणाचं नाही घेतलं की, रिया म्हणत आहे की, माझ्या बॉयफ्रेंडला वाटतं की, तो डॉन आहे, परंतु वास्तविक पाहता मी डॉन आहे.

व्हिडीओत रिया म्हणते, “मी खूप मोठी डॉन आहे. मला माहित आहे की, या लहान गुंड्यांकडू कसं काम करून घ्यायचं. माझ्या बॉयफ्रेंडलाही वाटतं की, तो गँगस्टर आहे. परंतु त्याला नाही माहित की, खरी डॉन मी आहे. मी या लहान गुंड्यांपासून वेगळी आहे. मी माझे हात खराब नाही करत. मी इतरांना काम करायला सांगते. उदाहरण म्हणून मी त्यांना एका निर्मात्याकडे जाऊन हप्ता जमा करायलाही सांगू शकते. त्यांना वाटतं की, ते डॉन आहेत. परंतु ते माझ्यासाठी काम करत आहेत.” व्हिडीओत ती शेवटी म्हणत आहे की, हे रेकॉर्ड करू नका.

रियाचा हा व्हिडीओ कधीचा आहे हे मात्र माहित नाही. परंतु सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. रियाच्या विधानांचीही खूप चर्चा होत आहे.