जेव्हा सुशांत सिंह राजपूत ऐश्वर्या रायच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये डान्स करत होता ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. चाहते आणि सेलेब्स अजूनही सुशांतची आठवण काढत आहेत. सध्या सुशांतचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सुशांतचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे जो युट्युबवरून प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओत आहे की, सुशांत सिंह राजपूत बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चनच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये डान्स करत आहे. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. व्हिडीओ तसा जुनाच आहे परंतु नव्यानं व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सुशांत सिंह राजपूत कोरियोग्राफर श्यामक दावर याच्या डान्सिंग टीमचा भाग होता. त्यानं अनेक कार्यक्रमात सादरीकरण केलं आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ साल 2006 मधील आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्यील एका सोहळ्यादरम्यानचा आहे ज्यात ऐश्वर्याच्या डान्सदरम्यान तो तिच्या मागे डान्स करताना दिसत आहे.