बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी US सोडून भारतात आली होती ‘देसी गर्ल’ प्रियंका ! जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियंका आपल्या काही फोटो आणि व्हिडीओमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. एक वेळ अशी होती जेव्हा प्रियंका अमेरिकेतून भारतात पळून आली होती. आज आपण तिच्या याच किस्स्याबद्दल माहिती घेणार आहोत.

प्रियंकानं तिची बायोग्राफी अनफिनिश्ड मध्ये आपल्या लहानपणीच्या काही किस्स्यांबद्दल सांगितलं आहे की, जेव्हा ती 12 वर्षांची होती तेव्हा भारतातून शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. प्रियंकानं सांगितलं की, शाळेत होणाऱ्या दादगिरीला वैतागून ती अमेरिका सोडून देशात परत आली होती.

अनफिनिश्ड या तिच्या बायोग्राफीत प्रियंकानं लिहिलं की, स्कुलमधील दादागिरीला मी पर्सनली घेतलं होतं. मला एवढा राग आला होता की, मी गप झाले होते. जेव्हा कुणी मला पहात होतं तेव्हा वाटायचं की, कुणी माझ्याकडे पाहू नये. मला काहीही करून गायब व्हायचं होतं. माझा कॉन्फिडंस झिरो झाला होता. त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं की, मी काय करू आणि मी कोण आहे.

पुढं प्रियंका सांगते की, शाळेत मला इतर मुली ब्राऊनी म्हणून हाक मारत होत्या. सर्वजणी मला आपल्या देशात परत जायला सांगत होत्या. त्या म्हणायच्या की, त्या हत्तीला घेऊन जा ज्यावर बसून तू आली आहेस. प्रियंकानं स्कुल काऊंसलरची मदत घेतली. परंतु त्यांचीही मदत झाली नाही. मी शहराला याचा दोष देत नाही. मला वाटतं की, टीनएजमध्ये मुलं असंच वागतात. त्या मुलींचीही काही चूक नव्हती. आता मी 35 ची झाली आहे तर मला याची दुसरी बाजूही लक्षात येत आहे. परंतु एक वेळ अशी होती जेव्हा मी अमेरिके सोबत ब्रेकअप केलं होतं आणि भारतात परत आले होते.

भारत वापसी बद्दल बोलताना प्रियंका सांगते, चांगलं झालं की, मी रागात तो निर्णय घेतला. आज मी ज्या टप्प्यावर आहे, त्यामुळं खूप खुश आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होता. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 आणि टेक्स्ट फॉर यु या सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.