भारतीय महिलांच्या ‘सेक्शुअलिटी’बाबत प्रश्न करणाऱ्या अभिनेत्रीला ऐश्वर्या रायनं दिलं ‘रोकठोक’ उत्तर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ऐश्वर्या राय हिचा लग्नाआधीचा एक किस्सा समोर आला आहे. हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा ऐश्वर्या अमेरिकतील फेमस टीव्ही शो ओप्रा विन्फ्री शो मध्ये गेली होती. या शोमध्ये ऐश्वर्या आणि ओप्रा यांच्यात भारतीय महिला, त्यांची सेक्शुअल लाईफ आणि अरेंज मॅरेजवर अनेक गोष्टींवर हसत बातचित झाली. ओप्राला ऐश्वर्याकडून जाणून घ्यायचं होतं की, भारतात लोक गोरं होण्याच्या नादात लाखो करोडो खर्च करतात ? यावर ऐश्वर्या म्हणाली की, हो खरं आहे. लोक गोरं होण्यासाठी खूप पैसे खर्च करतात.

एश्वर्याचं म्हणणं होतं की, भारतात गोरेपणासाठी तेव्हा जास्त मागणी होऊ लागली जेव्हा मेट्रोमोनिल्स भारतात आले. अनेक जाहिराती आल्या. यात एक कॉलम होता फेअर. यानंतर गोरं बनण्यासाठी धडपड सुरू झाली.

ऐश्वर्या सेक्शुअलिटी, अरेंज मॅरेज आणि लग्नानंतर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवणे यावरही भाष्य केलं. ऐशवर्यानं सांगितलं की, “भारतात आजही रस्त्याच्या बाजूला सेक्स किंवा किस केलं जात नाही. कारण भारतीय लोक असं मानतात की, शारीरिक संबंध हे भावनांशी जोडले गेलेले आहेत. म्हणून ते खासगी ठिकाणी ठेवले जातात.

भारतीय परंपरांची चाहती झाली अ‍ॅक्ट्रेस

ओप्रा ऐश्वर्या रायकडून एवढी प्रभावित झाली की, तिनं शोमध्ये ऐशकडून साडी नेसून घेतली. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे जो 2005 सालचा आहे. ऐश तेव्हा 30 वर्षांची होती. ओप्रा विन्फ्री एक होस्ट, अॅक्ट्रेस आणि टीव्ही शोची प्रोड्युसर आहे.