‘या’ सिनेमांनी ‘रजनीकांत’ला बनवलं ‘सुपरस्टार’ ! कधी ‘बिग बीं’नी दिला होता राजकारणात न येण्याचा सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडपासून तर हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी गुरुवारी (3 डिसेंबर 2020 रोजी) आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीबद्दलचा लाँग टाईम सस्पेन्स संपवला आहे. त्यांनी सांगितलं की, 2021 मध्ये ते आपल्या पक्षाची सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सूचित केलं आहे. 31 डिसेंबर रोजी ते या पक्षाची घोषणा करणार आहेत.

बिग बी अमिताभनं दिले होते 3 सल्ले

गेल्या वर्षी एका सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंग दरम्यान रजनीकांत यांनी सांगितलं की, बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांना 3 सल्ले दिले होते. पहिला सल्ला होता की, नियमितपणे व्यायाम करा. दुसरा सल्ला होता की, कायम बिजी राहा. लोक काहीही म्हणोत चिंता करू नका. तिसरा सल्ला देताना अमिताभनं सांगितलं होतं की, कधीही राजकारणात येऊ नका. मी त्यांचे दोन सल्ले तर ऐकले. परंतु परिस्थितीमुळं मी त्यांचा तिसरा सल्ला अमलात आणू शकलो नाही.

बॉलिवूडला दिले अनेक सुपरहिट सिनेमे

रजनीकांत साऊथमधील मोठं नाव आहेच. सोबतच बॉलिवूडमध्येही महान अ‍ॅक्टरच्या यादीत त्यांचं नाव आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अंधा कानून हा त्यांचा बॉलिवूडमधील पहिला सिनेमा होता. पहिल्या सिनेमात त्यांनी असं काम केलं की, बिग बी आणि हेमा मालिनी अशा स्टार्सलाही ते सरस वाटू लागले. चालबाज हा त्यांचा बॉलिवूडमधील दुसरा हिट सिनेमा होता. यानंतर त्यांनी जे काही सिनेमे केले त्यानंतर ते मोठे स्टार म्हणून उदयास आले. त्यांनी रोबोट, 2.0, बाबा, बुलंदी, आगाज, क्रांतिकारी, आतंक ही आतंक, इंसानियत के देवता, त्यागी, दलपति, फूल बने अंगारे, हम, खून का कर्ज, फरिश्ते असे अनेक सिनेमे करत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलं.