जेव्हा कंगना रणौतनं घातली 600 रुपयांची साडी आणि हातात कॅरी केली 2 लाखांची हँडबॅग !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार कंगना रणौत तिच्या एका फोटोमुळं चर्चेत आली आहे. कंगनाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोची खास बात अशी की, या फोटो तिनं फक्त 600 रुपयांची साडी घातली आहे. तिच्या हातात जी बॅग दिसत आहे ती 2 लाख रुपयांची आहे. सोबतच तिनं एक ट्रेंच कोटही घातला आहे.

अनेक चाहत्यांना याचंच आश्चर्य वाटत हे की, कंगनानं एवढ्या कमी किंमतीची साडी का घातली असेल. एवढी साधी साडी घालूनही कंगना खूप सुंदर दिसत आहे. तिनं ब्लॅक ट्रेंच कोट, हाय हिल्स आणि मॅचिंग कलरच्या बॅगेसोबत बॅग आणि चष्माही कॅरी केला होता.

कंगनाच्या या साडीच्या किंमतीबद्दल तिची बहिण रंगोली चंदेल हिनं खुलासा केला होता. रंगोलीनं ट्विट करत म्हटलं होतं की, कंगना, कोलकात्याहून खरेदी केलेली 600 रुपयांची साडी घालून जयपूरच्या एका इव्हेंटसाठी रवाना होताना.”

काहींनी कंगनाचं कौतुक केलं आहे तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. कारण कंगनानं जो कोट, बँग आणि चष्मा कॅरी केला होता ते परदेशी होत त्यांची किंमत लाखांमध्ये होती.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

You might also like