माहितीय का ? आपल्या मुलीसोबतच लग्न करण्याची होती महेश भट यांची इच्छा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडला वाद हा काही नवीन नाही. आशिकी, सडक, अर्थ यासारखे चित्रपट देणारे निर्माता दिग्दर्शक महेश भट ९० च्या काळात अशा वादामुळे चर्चेत होते की त्याची चर्चा आजही केली जाते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य हा चर्चेचा विषय बनतो. त्यांची मोठी मुलगी पूजा भट्ट यांच्यासोबत लिपलॉक करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमुळे सर्वत्र एकाच खळबळ माजली होती. या फोटोमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याचा परिणाम इतका झाला की महेश भट यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा आल्या. लोकांनी त्यांच्यावर भारतीय सभ्यता खराब केल्याचा आणि समाजत चुकीचा संदेश पोहोचवत असल्याचा आरोप लावला. समाजातुन या फोटोबाबत अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.

या वादानंतर महेश भट्ट यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत ते असे काही बोलले होते. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यांनी ‘पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असते’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तो फोटो देखील खोटा असल्याचे म्हंटल होतं.

महेश भट यांनी २० व्या वर्षीच लॉरेन ब्राइटशी लग्न केल होतं. लग्नानंतर काही दिवसांनी लॉरेननं आपलं नाव बदलून किरण भट असं केलं. या दोघांना २ मुलं आहेत. पुजा आणि राहुल. मात्र लॉरेन आणि महेश यांचं हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. याला कारण होतं महेश यांचं परवीन बॉबी यांच्याशी असलेलं अफेअर. मात्र परवीन यांच्या आजारपणामुळे महेश तिच्यापासून वेगळे झाले. आणि आपल्या पत्नीकडे परत आले.

किरण यांच्याकडे परतल्यानंतरही महेश आणि किरण यांच्या नात्यातील कटुता कमी झाली नाही. ज्यामुळे १९८६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आणि सोनी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केल. सोनी राजदान यांच्यापासून महेश यांना २ मुली आहेत. आलिया आणि शाहिन. आलियानं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये स्थान मिळवलं आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like