Video : जेव्हा सारा अली खान रस्त्यावर करू लागली डान्स, भिकारी समजून लोक देऊ लागले पैसे !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan) कायमच आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. अलीकडेच ती सुशांत सिंह राजपूत केसमधील (Sushant Singh Rajput) ड्रग्ज कनेक्शनमुळं चर्चेत आली होती. आता आपल्या एका व्हिडिओमुळं तिनं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. सारा अली खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो वेगानं व्हायरल होत आहे. सारानं एक मजेदार किस्सा सांगितला जेव्हा लोकांनी तिला भिकारी समजून पैसे दिले होते.

साराचा एक व्हिडिओ इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे. साराचा हा थ्रोबॅक व्हिडिओ एका मुलाखतीतला आहे. ही मुलाखत तिच्या डेब्यू सिनेमादरम्यानची असावी. सारा म्हणते, “आम्ही त्यावेळी परदेशात होतो. आई बाबा दोघंही शॉपिंगसाठी आत गेले होते. मी आणि भाऊ इब्राहिम दोघं बाहेरच थांबलो होतो. त्यांना यायला वेळ होता. आमच्या सोबत हाऊस हेल्पही होती. मी अचानकच डान्स करू लागले. तिथल्या लोकांना वाटलं की, मी भिकारीच आहे. त्यांनी मला पैसे दिले.”

https://www.instagram.com/p/CEys-9GBke4/?utm_source=ig_embed

पुढं सारा म्हणते, लोकांना असं वाटलं की, मी भीक मागत आहे. मीही ते पैसे ठेवून घेतले. मला एवढचं कळालं की, मला पैसे मिळत आहेत. मी आणखी डान्स करू लागले. नंतर माझे आईबाबा आले. यावेळी हाऊस हेल्प म्हणाली की, सारा किती क्यूट दिसत आहे लोकांनी तिला पैसे दिले आहेत. यावर आई म्हणाली की, क्यूट नाही ती भिकारी दिसत आहे म्हणून लोकांनी पैसे दिलेत.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.