जेव्हा ‘किंग’ शाहरुखनं गौरीसोबत केला होता बुरख्या वाला प्रँक ! पुढं झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) बॉलिवूडमधील फेमस कपलपैकी एक आहेत. दोघांची लव स्टोरी सर्वांनाच माहिती आहे. त्यांची केमिस्ट्री तर सर्वांनाच हैराण करत असते. इटर रिलीजन लग्न असल्यानं याची खूप चर्चा झाली होती. एका चॅट शोमध्ये शाहरुखनं लग्नाबद्दलचे अनेक सिक्रेट सांगितले आहेत.

शाहरुखनं सांगितलं की, त्याच्या लग्नाचं रिसेप्शन होतं. त्यानं नातेवाईकांना गौरीच्या धर्मपरिवर्तनाबद्दल बोलताना ऐकलं. यावर त्यानं काहीतरी विनोदी करण्याचं ठरवलं. यानंतर दुपारी एक ते दीडच्या सुमारास गौरीजवळ आला आणि गौरीला बोलला चल बुरखा घाल आणि नमाज पढ. चल लवकर कर.

हे ऐकताच गौरीचे नातेवाईक आणि गौरी सर्वच हैराण झाले. कोणालाच कळत नव्हतं की काय सुरू आहे. शाहरुखनं त्याचं प्रँक कंटिन्यु करत म्हटला की, आजपासून ही बुरख्यातच राहिल. घरातून ही बाहेर जाणार नाही. आम्ही हिचं नावही बदलणार. आता हिचं नाव आयशा असेल. परंतु जेव्हा सर्व लोक जास्त अवाक् झाले तेव्हा त्यानं खुलासा केला हा एक प्रँक आहे. मला खूप मजा आली होती. मला सर्वांना हा धडा द्यायचा होता की, सर्वांनी आपल्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे. परंतु हा प्रेमाच्या रस्त्यात नाही आला पाहिजे.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच तो पठाण मध्ये दिसणार आहे.