जेव्हा अबराम आणि आराध्या बच्चनचं नाव घेत ‘किंग’ खान म्हणाला – ‘प्रेमाला वय नसतं’ ! ‘अशी’ होती ‘बिग बी’ अमिताभची ‘रिअ‍ॅक्शन’

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि काजोल यांची जोडी कोणी तोडू शकत असेल तर ते फक्त अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या आणि अबराम आहे असं शाहरुख खानचं म्हणणं आहे. खास बात अशी की, बिग बी अमिताभ बच्चनही याची वाट पहात आहेत.

एकदा एका पत्रकार परिषदेत बोलताना शाहरुखला सांगण्यात आलं की, दीपिका रणवीर, दीपिका रणबीर, फवाद सोनम यांच्यात बेस्ट जोडी निवड. तर त्यानं बिग बींची नात आराध्या आणि त्याचा लहान मुलगा अबराम यांचं नाव घेतलं. यावर असहमती दाखवत काजोल म्हणाली की, अबराम आराध्यापेक्षा लहान आहे. तर शाहरुख यावर म्हणाला की, प्रेमाला वय नसतं.

शाहरुखच्या या वक्तव्यानंतर बिग बी अमिताभ खूप खुश झाले होते. यावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले होते की, त्यांच्या तोंडात तूप साखर आणि दूध मलाई.”

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.