‘किंग खान’नं त्याची मैत्रीण फराह खानच्या पतीला सर्वांसमोर मारली होती ‘थप्पड’ ! जाणून घ्या पूर्ण प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा एक जुना किस्सा सध्या व्हायरल होत आहे जो वाचल्यानंतर तुम्हीही चकित व्हाल. एका पार्टीत शाहरुख आणि कोरियोग्राफर फराह खानचा पती शिरीष कुंदर यांच्यात असं काही झालं होतं की, रागाच्या भरात शाहरुखनं शिरीषला थप्पड मारली होती. हा किस्सा एका पार्टीतला आहे ज्यात संजय दत्त होस्ट होता. नंतर यावर फराह खाननंही भाष्य केलं होतं.

एका इंग्रजी वृत्तानुसार, शीरीष पूर्ण पणे नशेत होता आणि तो शाहरुखला प्रत्येक ठिकाणी फॉलो करत होता. नंतर रागाच्या भरात शाहरुखनं त्याला सोफ्यावर पाडलं आणि पंच केलं. नंतर फराह खाननंही यावर भाष्य केलं होतं. फरहा म्हणाली होती की, “शिरीष, माझ्या पतीला शाहरुख खान आणि त्याच्या तीन बॉडीगार्ड्सनी संजय दत्तच्या पार्टीत मारहाण केली. शाहरुखनं शिरीषला विचारलं की, तू माझ्या विरोधात ट्विट का केलंस ? आमच्याकडून कोणीचा त्याला भडकवलं नव्हतं. शिरीषवर तो ओरडत होता. तो म्हणत होता की, तो मला बरबाद करेल.”

असंही सांगितलं जात आहे की, या भांडणात संजय दत्तनं मध्यस्थी केली होती. परंतु त्यानंही शिरीषला महिलांसोबत मिसबिहेव केल्याचा आरोप करत थप्पड लगावली. यावर शाहरुखनं मौन धरलं आणि शिरीषनंही कोणतं पाउल टाकलं नाही. अलीकडे शाहरुख आणि फराह यांच्यातील संबंध सुधारले आहेत.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like