दिग्दर्शकानं पार्टीत केलं ‘असं’ काही, अभिनेत्रीनं कापलं हाताचं मनगट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुभाष घई 80 च्या दशकातील प्रसिद्ध फिल्ममेकर आहेत. त्यांचं नाव बॉलिवूड मधील टॉपच्या डायरेक्टर्समध्ये घेतलं जातं. त्यांनी कर्ज, कर्मा, खलनायक, परदेस यांसारखे अनेक यादगार सिनेमे तयार केले आहेत. परंतु त्यांच्यामुळं एखादी अ‍ॅक्ट्रेस आपलं मनगट कापेल असं त्यांना कधीच वाटलं नसेल.

हा किस्सा आहे तेव्हाचा जेव्हा सुभाष घई आपल्या राम लखन या सिनेमाची शुटींग करत होते. या सिनेमात जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, गुलशन ग्रोवर प्रमुख भूमिकेत होते. या व्यतिरीक्त सोनिका गिल हीदेखील एक भूमिका साकारत होती. सोनिकानं अनेक बी ग्रेड सिनेमात काम केलं आहे. हा सिनेमा त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंटवाला होता. एका रिपोर्टनुसार, सोनिका अपेक्षेप्रमाणे सीन देत नव्हती. यामुळं सुभाष घई तिला कायमच ओरडायचे, रागवायचे. अनेकदा त्यांनी तिला सर्वांसमोरही ऐकवलं होतं. सोनिका या साऱ्याला खूप वैतागली होती.

शुटींग संपल्यानंतर सिनेमाच्या रॅपअप पार्टीदरम्यान दोघंही पुन्हा आमने सामने आले आणि दोघांमध्ये पुन्हा काहीतरी झालं. सोनिका वाटलं घई मुद्दाम सर्वांसमोर तिला निचा दाखवत आहेत. यामुळं ती खूप फ्रस्टेट झाली होती. रागाच्या भरात तिनं आपलं मनगट कापलं होतं. स्टारडस्ट मॅगेझिनमध्येही या बातमीचा उल्लेख आहे. सोनिकाला याबद्दल विचारलं असता तिनं यावर कधीच काहीही भाष्य केलं नाही. परंतु घई यांना याबाबत विचारलं असता त्यांनी ही बाब मान्य केली. त्यांनी यामागील कारणं सांगताना सोनिकाची खासगी कारणं असल्याचं सांगितलं.